सुविद्यया प्राप्यते यश: असे बोधवाक्य असलेल्या सुविद्या प्रसारक संघाच्या आज बोरीवली उपनगरात चार शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे व त्यामध्ये जवजव पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही गोष्ट आपणा सर्वांनाच अभिमानाची आहे.

आज एवढा विस्तार पावलेल्या सु.प्र.संघाचे बीजारोपण 4 एप्रिल 1971 रोजी वर्षप्रतिपदेच्या(गुढी पाडवा) शुभ मुहूर्तावर सहकारी गॄहनिर्माण संकल्पनेचे अध्वर्यु कै.श्री.मोरेश्वर विष्णू परांजपे यांच्या प्रेरणेने झाले. त्यांच्यासोबत निष्ठेने, धडाडीने, कल्पकतेने व नि:स्वार्थीपणे काम करणारे संस्थापक सदस्य होते श्री.गो.रा.रानडे श्री..रा.खांडेकर श्री.दि.त्रिं.जोशी श्री.बा..गोवंडे श्री.नी.गं.देशपांडे श्री.श्री.वि.देसार्इ श्री..त्रयं.मराठे कै.श्री.गो.के.केतकर श्री.वि.के.काणे श्रीमती सु.के.जोशी आणि श्रीमती क..पटवर्धन.

 

सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पहिल्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली :

श्री.गो.रा.रानडे - कार्याध्यक्ष श्री.नी.गं.देशपांडे-कार्यवाह

श्रीमती क..पटवर्धन.-कोषाध्यक्ष श्री.मो.वि.परांजपे-सदस्य

श्री..रा.खांडेकर-सदस्य श्री.वि.के.काणे-सदस्य

श्री.. त्रयं.मराठे-सदस्य

 

आज संस्थेच्या चार शाळातील पूर्व प्राथमिक विभाग उत्तम तहेने कार्यरत आहेत. बालकांच्या नैसर्गिक प्रवॄत्तींचा उपयोग करून अनौपचारीक शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षणाचे प्रशंसनीय कार्य करीत आहेत. त्या कार्याची दखल महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेने घेतली आहे. तशा आशयाचे प्रमाणपत्र तीनही शाळाना प्रदान करण्यात आले आहे. अतिशय कमी विद्यार्थी संख्येने सुरू झालेला पूर्व प्राथमिक विभाग आज अनेक बालकांना घडविण्याचे कार्य करीत आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या जडणघडणीत संस्थेच्या संस्थापक सदस्या श्रीमती सुषमा जोशी ह्मांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.

 

आज शाळातील विद्यार्थी शालांत परीक्षेला बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येत आहेत. .4 थी व
.7 वीच्या स्कालरशिप परीक्षेतही असेच उत्तम यश मिळावीत आहेत. विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व स्पर्धेच्या जगात प्रवेश करताना त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा म्हणून संस्थेतर्फे शाळातून इंग्रजी संभाषण वर्ग चालविण्यात येतात. .. 2000-2001 ह्मा शैक्षणिक वर्षापासून संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये अतिशय अद्ययावत असे संगणक कक्ष उभारण्यात आले आहेत. इयत्ता पहिली पासून आता विद्याथ्र्यांना संगणक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

संस्थेचे भाग्य असे की संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला अतिशय सेवाभावी वॄत्तीने, निरलसतेने व प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मित गेले. तसेच तीनही शाळातून विद्याथ्र्यांच्या शिक्षणाविषयी क व आस्था असणारा शिक्षकवर्ग संस्थेला मिाला. संस्थेच्या सर्व शाळातील कर्मचारीवर्ग सुद्धा विद्याथ्र्यांच्या हितासाठी आपापल्यापरीने झटणारा आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम चारही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय उत्तम नावलौकिक मिLवून कार्यरत आहेत.

 

संस्कारक्षम शिक्षण देतानाच शिस्तप्रिय विद्यार्थीवर्ग तयार करण्याकडे संस्थेचा कटाक्ष आहे. या कार्यात श्रीमती नीलातार्इ जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. विद्याथ्र्यांच्या मनाता राष्ट्रभक्ती जोपासणारे लोकमान्य टिक पुण्यतिथी सारखे विविध उपक्रम कै.श्री...दांडेकर यांच्या प्रेरणेने सुरू झाले. संस्थेच्या विकासाच्या वाटचालीत श्री,.सु..काशीकर,,, श्री..मा.अंकोलेकर, श्री...दामले, श्री.भि.रा.ताम्हनकर, श्री...बने, श्री.मनोहर गोखले इत्यादींचे महत्वाचे योगदान आहे.

 

संस्थेच्या यशस्वी वाटचालीत अनेक उदार देणगीदार व शाळाचा पालकवर्ग ह्मांचाही सिंहाचा वाटा आहे. पालकांचे असे उदंड प्रेम संस्थेला लाभले हे आमचे भाग्य त्यामुच सुविद्या प्रसारक संघ ही एक नुसती संस्था राहिली नसून संस्था, चार , शाळाचे शिक्षक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थी, उदार आश्रयदाते व देणगीदार ह्मा सर्वांचा एक परिवार बनला आहे.

 

सुविद्या प्रसारक संघाच्या ह्मा गौरवास्पद वाटचालीत अनेक संस्था व सामाजिक बांधिलकीची जाण असणाया अनेक उदार व्यक्ती ह्मांचे अर्थपूर्ण सहाय्य झाले आहे. काही व्यक्तींचासंस्थांचा उल्लेख वर आलेला आहे. अशा काही संस्था व व्यक्तींचा उल्लेख करणे हे आमचे कर्तव्य तर आहेच पण असा उल्लेख करणे हे आमचे कर्तव्य तर आहेच पण असा उल्लेख करणे आम्हाला अभिमानास्पदही आहे. उदाहरणार्थ, श्री मुंबादेवी मंदिर^रिटीज्, मुंबर्इ श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, स्वयंभू श्री गणेश देवस्थान, वझीरा गांवठाण, बोरीवली, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विलेपार्ले, श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबर्इ, अड.श्री.जान रूमाओ, बोरीवली, श्री काशिनाथ म्हात्रे, बोरीवली, श्री.हेमंत कानिटकर, लंडन इत्यादि.