Baburao Paranjape Nagar, Vazira Naka, Borivali (West), Mumbai– 400091.        

जून १९७४ ला एस.एस.सी.परीक्षा प्रथम बॅच.शाळेचा निकाल ९७.००% 

८१.७% ला प्रथम

१९८२-८३ ला ज्ञानदिप मंडळाची स्थापना सामाजिक प्रेरणा देणारा उपक्रम

१९८३-८४ पासून सेमी इंग्रजी सुरु.इंग्रजी संभाषण वर्ग सुरु.विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडविण्याच्या दृष्टीने संस्कार व्याख्यान मालेचे आयोजन.

१९८३-८४ मध्ये एक्सर विभाग सुरु .

१९८४-८५ मध्ये *National Association for Blind या संस्थेला जास्त मदतनिधी मिळवून दिल्याबद्दल कु.योगेश शिंदे याला ब्रेबॉर्नस्टेडियममध्ये झालेल्या समारंभामध्ये मा.श्री.दिलीपकुमार यांच्या हस्ते बक्षीस व शाळेला मानचिन्ह. 

*विरार ते मालाड परिसरातील हुशार मुलांसाठी (बी.टी.एस,)इंग्रजी व मराठी माध्यमांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरु.

1987–88 शाळेचे मुख्याध्यापक श्री.श.ना.दिक्षीत यांना राष्ट्रपती पुरस्कार.

टिळक महाराष्ट्र विदयापीठातर्फे घेण्यात येणा–या गणित व इंग्रजी परीक्षा डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा‚माध्यमिक शिष्यवॄत्ती परीक्षा व गणित प्रविण्य व प्रज्ञा एलिमेंटरी व इंटरजिमिएट परीक्षांसाठी शाळेतील विदयार्थ्यांसाठी शाळेकडून खास मार्गदर्शन

1992– 93 माध्यमिक शिष्यवॄत्ती परीक्षा कु आदित्य विलास कुडतरकर शहरी विभागातून पहिला व महाराष्टा्रतून दुसरा.

1996–97 एस.एस.सी.बोर्डात 4 विदयार्थी गुणवत्ता यादीत.

1997–98 एस.एस.सी.बोर्डात 2 विदयार्थी गुणवत्ता यादीत.

*कु.मानसी देसार्इ हीचा एस.एस.सी.बोर्ड अंध विदयार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत लक्षवेधी गुणवत्तेची शाळेला डॉ.विक्रम साराभार्इ ढाल व मानचिन्ह.

 

2001– 02 एस.एस.सी.बोर्डात 7 विदयार्थी गुणवत्ता यादीत.

2004–05  कु.मनश्री सोमण हीस राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे हस्ते बालश्री पुरस्कार प्राप्त.

कु.सायली चक्रे व राधिका घरत यांनी पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बालमहोत्सवात भारताच्या विविध राज्यातील नॄत्यप्रकारांचे सादर करून

भारताचे प्रतिनिधित्व केले.