सुविद्या प्रसारक संघाचे सुविद्यालय प्राथमिक विभाग

सन १९७३ साली प्राथमिक विभागाला मान्यता मिळाली. बोरिवलीतील नामांकित आदर्श म्हणून शिक्षण निरीक्षकांकडून गौरविण्यात आलेली शाळा.

शाळेची उत्तोरोत्तर प्रगती झाली. R/C वार्डतर्फे घेण्यात आलेल्या अनेक स्पर्धामधून शाळेने पारितोषिके पटकावली. सतत शैक्षणिक प्रदर्शने भरपूर विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिले.

सन १९८७ साली मुख्याध्यापिका श्रीमती सरिता गानू याना महापौर पुरस्कार प्राप्त झाला.

सन २००१ साली श्रीमती नंदा कांबळे याना महापौर पुरस्कार प्राप्त झाला.

विविध स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.

दरवर्षी ते विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त होते.

विशेष उल्लेखनीय  :

१९९७ साली एकूण विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त झाली.त्यापैकी कु.शशांक सामंत या विद्यार्थ्याने मुंबई विभागातून पहिला येण्याचा मान पटकावून सुविद्यालायाचा नावलौकिक वाढविला. तसेच सन २००८ साली १४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.सन २०१२ साली १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली त्यापैकी कु.गौरी बापट हिने ३०० पैकी २९६ गुण प्राप्त करून मुंबई विभागातून पहिली महाराष्ट्र राज्यातून दुसरी येण्याचा मान पटकाविला. शाळेने संस्थेने तिचा पालकसभेत मा.नगरसेवक श्री.मोहन मिठबावकर यांच्या हस्ते सत्कार केला. तसेच इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे कु.गौरी बापट हिला सुवर्णपदक देण्यात आले.

 

आजतागायत स्कॉलरशिप मध्ये नैपुण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांची परंपरा चालू आहे. तसेच कोणत्याही आंतरशालेय स्पर्धेला गेलेला विद्यार्थी हा बक्षीस पटकावूनच येतो शाळेचे नाव उज्वल करतो.अशा प्रकारे सुविद्यालय प्राथमिक विभागात हसत खेळत विद्यार्थी ज्ञान प्राप्त करतात.

 

Baburao Paranjape Nagar, Vazira Naka, Borivali (West), Mumbai– 400091.