दि. 26 सप्टेंबर 1993 रोजी योजनेचे नामकरण श्री. मंगुभार्इ दत्ताणी विदयालय असे करण्यात आले.  कै.  श्री. मंगुभार्इ दत्ताणी यांच्या तीन सुपुत्रांनी श्री. अनिलभार्इ,  श्री. भरतभार्इ,  व श्री. सतिशभार्इ  यांनी श्री. मंगुभार्इंच्या स्मॄतिस स्मरून लाखों रूपयांची देणगी शाळेस दिली. शाळेची आजची वास्तू ही त्यांच्या देणगीतूनच उभी राहिली.

आतापर्यत शाळेतील अनेक कार्यकमांना नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभली आहे. यात श्री. नारायण सुर्वे, श्री. मंगेश पाडगांवकर , श्री.राम शेवाळकर , श्री.लीलाधर हेगडे , श्रीम. लीला पाटील  यासारखे साहित्त्यिक तसेच श्री.सदाशिवराव मांडलिक , श्री.सुधीर जोशी, श्री. राम नार्इक  हे केंदिय मंत्री तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक विभूतिंनी योजनेस ज्ञानामॄत दिले आहे.

हे ज्ञानामॄत घेऊन येथून बाहेर पडलेले विद्यार्थी आज सुजाण पालक झाले आहेत. अध्यापन , आयटी , राजकीय , वैद्यकीय , सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संगीत, चित्रकला , नॄत्य , अभिनय , क्रीडा अशा विविध माध्यमातून आपली संस्कॄती जपत आहेत. या सा-यात देशसेवेचे पवित्र क्षेत्रही अपवाद नाही. बुध्दीमत्तेच्या , कलेच्या जोरावर विविध पदांवर केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपले कर्तॄत्व गाजवत आहेत.

सहशालेय उपक्रम :

             सुशोभन , रांगोळी, भित्तिपत्रके , विविध प्रकारचे फलक लेखन , कॄती कार्यक्रमांची मांडणी , विविध विज्ञान प्रदर्शने , हस्तकला , चित्रकला व कार्यानुभव वस्तूची सुनियोजित मांडणी , प्रदर्शने ही योजनेच्या चढत्या पाय-यांची प्रतीके आहेत. विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमात SSC बोर्डात गुणवत्ता यादीत मानाचा तुरा रोवणारे -

1. आसावरी भानुदास भावे.  2. हेमंत शिवराम भोसले.  3. प्रणोती प्रविण बेर्डे हे तीन विद्यार्थी आहेत.

 

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.

Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय