दि.१४ जून १९७१ रोजी सु.प्र.संघाच्या पहिल्या शाळेतील पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली हे विभाग अस्तित्वात आले.त्यावेळी सध्या अस्तित्वात असलेली शाळेची इमारत नव्हती.त्यामुळे सुरुवातीला बालमंदीराचे वर्ग श्री.सु.कृ.बागुल,भक्तियोग सोसायटी (४ ब/१९०) येथे व श्री अ.वा.गोखले व श्री.वि.वा.गोखले,भक्तियोग सोसायटी (२/६३ व ६४) यांच्या सदनिकेत भरत असत. त्याच वेळी सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या योगानंद सोसायटीतील सभासदांनी सोसायटीच्या मालकीचा १००० चौरस वाराचा भूखंड ९९९ वर्षाच्या भाडेकराराने नाममात्र भाडयाने सु.प्र.संघास दिला .

 

प्राथमिक विभागातील इयत्ता पहिलीचा वर्ग सुरुवातीला श्री.म.प्र.नामजोशी,भक्तियोग (४ ब/189 ) व नंतर भक्तियोग(४ ब/१९० ) येथे भरू लागला.पहिल्या वर्षी इयत्ता पहिलीत १८ विद्यार्थी होते.

संस्थेच्या स्वताच्या इमारतीत दि.जून १९७२ पासून संपूर्ण प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सुरु झाली .व विद्यार्थ्यांची संख्या १८ वरून १६२ वर गेली.जून १९७४ पासून पाचवीचे वर्ग सुरु झाले व शाळेचे "सुविद्यालय" असे नामाभिधान झाले.

 

१९७९-८० या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी शालांत परीक्षेला बसली व ३७ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे पहिल्याच वर्षी निकाल ९७ टक्के लागला.याच काळात शाळेच्या इमारतीचे बांधकामही टप्पा टप्प्याने सुरु झाले.दि.२ सप्टेंबर १९७८ रोजी सु.प्र.संघाचे आधारस्तंभ व संस्थापक सदस्य श्री.मो.वि.तथा बाबुराव परांजपे यांचे आकस्मिक निधन झाले .परंतु त्यावेळच्या कार्यकारी मंडळाने कै.बाबुराव परांजपे यांनी घालून दिलेल्या मार्गानेच व्रतस्थ भावनेने काम करण्याचा निर्धार केला व सु.प्र.संघाच्या विकासाचे काम नव्या जोमाने सुरु ठेवले .वेगाने विकसित होणा-या वझिरा/एक्सर या विभागातील पालकांची गरज लक्षात घेऊन सूविद्या प्रसारक संघाने सुविद्यालायाची एक शाखा एक्सर येथे चालू करण्याचा निर्णय १९८५ साली घेऊन प्रथम भाडयाच्या इमारतीत  इसवीसन १९८९ पासून संस्थेच्या स्वताच्या इमारतीत शाळा सुरु केली.त्यामुळे परिसरातील वाढीव विद्यार्थाची गरज काही अंशी पूर्ण करता आली.तेथील इमारतीसाठी लागणारा निधी संस्थेच्या कार्यकत्यानी घरोघर हिंडून गोळा केला.देणगीदारांची कमतरता संस्थेला कधीही जाणवली नाही/जाणवत नाही हे नमूद करताना संस्थेला सानंद अभिमान वाटतो.समाजाच्या संस्थेवरील विश्वासाचेच हे दयोतक आहे . 

 

सुविद्यालायाची धुरा एक उत्तम शिक्षक व विद्या दानाची अत्यंत तळमळ असलेली श्री.शं.ना.दीक्षित यांच्या हाती होती.त्यांच्या कर्तुत्वाची पावती १९८७ साली भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करून दिली.योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच वर्षी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता गानू यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेतर्फे महापौर पुरस्कार प्राप्त झाला.श्री.दीक्षित सरांनंतर  मुख्याध्यापक ह्या पदावर असलेल्या श्रीमती स्नेहल देशमुख ह्यांना २००१ साली महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.तर प्राथमिक विभागातील एक शिक्षिका श्रीमती नंदा कांबळे ह्यांना त्याच वर्षी महापौर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

 

Baburao Paranjape Nagar, Vazira Naka, Borivali (West), Mumbai– 400091.