बोरीवली पश्चिम येथे नव्याने विकसित होणा-या गोरार्इ भागात सुध्दा एका उत्तम शाळेची गरज असल्याचे संस्थेच्या दूरदॄष्टी असलेल्या समर्थ कार्यकारी मंडळाच्या लक्षात आले. त्वरित संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जोमाने व एक दिलाने कामास लागले.दि.5 आक्टोबर 1992 रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर गोरार्इ येथे म्हाडाकाडून लीजवर मिळोलेल्या भूखंडावर नवीन शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. सुरवातीच्या नजिकच्या परिसरात भाडयाने वापरावयास मिळालेल्या तीन गाळयांनमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील पहिलीचे वर्ग जून 1993 पासून भरविण्यास आरंभ झाला. व 1995 पासून संस्थेच्या स्वत:च्या इमारतीत शाळा सुरू करण्यात आली.

 

सुविदयालयातील एक अनुभवी, शिक्षणासंबधी कळकळ असणा-या व अत्यंत कार्यक्षम असणा-या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चित्रा कुलकर्णी यांची रितसर नेमणूक गोरार्इ येथील विदयालयाच्या मुख्याध्यापक पदी करण्यात आली. तसेच अत्यंत विदयार्थीप्रिय शिक्षक श्री...पवार यांची नेमणूक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक पदी  करण्यात आली.

 

बोरीवलीतील एक प्रसिध्दीपराङ्मुख दानशूर व्यक्तीमत्व म्हणजे श्री.मनोहर हरिराम चोगले. त्यांच्या उदार देणगीतून शाळेची वास्तू उभी राहिली आहे. त्यामुळे तेथील शाळेचे नामाभिधान "मनोहर हरिराम चोगले विदयालय" असे करण्यात आले आहे.

 

गोरार्इ येथील प्राथमिक विभागाला मुंबर्इ महानगरपालिकेने 2000 साली "आदर्श शाळा पुरस्कार" दिला आहे.

Text Box: मनोहर हरिराम चोगले विद्यालय

Dr. Babasaheb Ambedkar Road, Gorai, Borivali (West), Mumbai– 400091.