सुविद्या प्रसारक संघाचे

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

पूर्व प्राथमिक विभाग

गोरार्इ विद्यालय पूर्व पाथमिक व प्राथमिक विभागाचा शुभारंभ दिनांक 5 जुलै 1993 रोजी झाला.

 

          शैक्षणिक वर्ष 2013­2014 साठी बालकविहार, शिशुवर्ग, बालवर्ग नवीन प्रवेश सुरू आहे.

     "आमची वैशिष्टये"

•         प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग.

•         नवीन अभ्यासक्रम पद्धतीनुसार वर्कशीटस्व्दारे सर्व विषयांचा अभ्यास

•         प्रत्यक्ष अनुभवातून प्रत्येक विषयांचा परिचय

•         शैक्षणिक सिडींव्दारे मार्गदर्शन

•         शिशुवर्गापासून इंग्रजी विषयांची प्र्राथमिक स्वरूपात ओळख

•         विद्याथ्र्यांच्या सुप्त गुणांच्या वाढीसाठी शैक्षणिक साधनांचा वापर

•         विद्याथ्र्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन (निसर्गपूजा, बालदिन, विविध सण

          व उत्सव, सहवास शिबीर, स्नेहसंमेलन, पालक मेळावा इत्यादी)

•         विविध स्पर्धांचे आयोजन

शाळांतर्गंत विविध उपक्रम :

सहवास शिबिर हा एक आगळावेगळा उपक्रम यामध्ये बालवर्गातील विदयार्थी खूप धम्माल करतात. अगदी उद्घाटनापासून मैदानी खेळा हस्तव्यवसाय अल्पोपहार, शुभंकरोति, सहभोजन व शेवटी शेकोटीपर्यंत भरगच्च अस कार्यक्रमांच आयोजन असते. सर्वच मुले मनमुराद आनंद लुटतात.

सामुहिक वाढदिवस :

          स्तुत्य असा हा उपक्रम सु.प्र.संघाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकाच दिवशी सर्व    विदयाथ्र्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. शिक्षिका विदयार्थ्यांचे औक्षण करतात, गुरूजी मंत्रोच्चारातून आशिर्वाद देतात. अतिशय चैतन्यमय अशा वातावरणात मेजवानी व भेटवस्तूंचा आनंद घेत हा सोहळा संपन्न होतो.

          आनंदोत्सव म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन. यानिमित्ताने बालकांच्या कलागुणांना वाव मिळतो. प्रत्येकास कलाविष्कार सादर करण्यास संधी मिळते. सर्वचजण हा उत्सव आनंदाने साजरा करतात म्हणूनच तर हा आनंदोत्सव.

निसर्गपूजा :

          निसर्ग हा आपणास नेहमीच भरभरून देत असतो. या दात्याचे ऋण आपल्यावर असतात म्हणूनच त्याबद्द्ल कॄतज्ञता व्यक्त करण्यासच या निसर्गपूजेचे आयोजन केले जाते.

          प्रत्यक्ष उदयानात नेऊन मुलांना विविध पाने, फुले, त्यांचे रंग, उपयोग याबद्द्ल माहिती दिली जाते.

Dr. Babasaheb Ambedkar Road, Gorai, Borivali (West), Mumbai– 400091.        

Text Box: मनोहर हरिराम चोगले विद्यालय