Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय

विद्यालयाची स्थापना

बोरीवली (पूर्व) भागातील मागाठाणे विभागात उत्तम मराठी माध्यमाची शाळा नसल्याने तेथील पालकांची खूपच गैरसोय होत असे.तेथील काही मंडळांनी पुढाकार घेऊन सु.प्र.संघाचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्री.गो.रा.रानडे यांची भेट घेऊन बोरीवली(पूर्व)येथे शाळा सुरू करावी अशी त्यांना विनंती केली. त्यानंतर म्हाडाने शिक्षण संस्थेसाठी राखून ठेवलेला एक भूखंड संस्थेने लीजवर घेऊन तेथे शाळा काढण्याचे ठरविले. एकदा असे शैक्षणिक काम हाती घेतल्यावर दानशूर व्यक्तिंची कमतरता संस्थेला कधीच भासली नाही. अशा त-हेने योजना विद्यालयाची स्थापना दि.13 जून 1988 रोजी झाली. बांधकाम क्षेत्रातील अग्रणी श्री.मंगुभार्इ दत्ताणी यांनी संस्थेला घसघशीत देणगी दिली व संस्थेची सुंदर वास्तू टाटा पावर हाऊसच्या परिसरात उभी राहिली. शाळाचे नामाभिधान श्री.मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय असे करण्यात आले. केबल कार्पोरेशन आफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.दिलीपभार्इ खटाव यांच्याकडूनही भरीव देणगी शाळाकरिता मिळाली आहे.

सुविद्यालयातील एक अनुभवी, विद्यार्थी प्रिय व तडफदार शिक्षिका श्रीमती सुहासिनी कुलकर्णी यांची योजना विद्यालयातील मुख्याध्यापिका म्हणून रितसर नेमणूक करण्यात आली. संस्थेच्या मदतीने व स्वप्रयत्नाने त्यांनी थोडयाच अवधित एक उत्तम शाळा म्हणून योजना विद्यालयाला नावलौकीक दिला. प्राचार्या श्रीमती सुहासिनी कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव 1994 साली राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांचेतर्फे तर 1998 साली महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कार देऊन केला.

 

 

शैक्षणिक वर्ष 1992-93 पासून 10 अधिक 2 स्तरावर एम.सी.व्ही.सी. (Minimum Competency Vocational Course.) या सरकार मान्य तांत्रिक शिक्षण उपक्रमाचे वर्ग सुरू करण्यात आले. या शिक्षण उपक्रमात मेडिकल लब टेक्निशियन, बिल्डिंग मेन्टेनन्स व रिपेअर्स मार्केटिंग हे तीन कोर्सेस सध्या चालू आहेत. अनेक विद्याथ्र्यांनी या उपक्रमांतर्गत शिक्षण पूर्ण करून स्वत:साठी नोकरी -व्यवसाय मिळविला आहे. स्पेशल स्टील लिमिटेड कडून मिळालेल्या देणगीतून योजना विद्यालयात एक अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली. उत्तम व अद्ययावत प्रयोग शाळा शिक्षण खात्याकडून अकरावी सायन्स सुरू करण्याबाबत विचारणा करण्यात येत होती. त्या विनंतीला मान देऊन जून 1993 पासून अकरावी सायन्स सुरू करून तेथे कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात करण्यात आली. पुढे वाणिज्य शाखेचीही सोय करण्यात आली व आज मितीस कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य व शास्त्र हे दोन्ही शिक्षणक्रम चालू आहेत. महिन्द्र अड महिन्द्र या कंपनीकडून मिळालेल्या देणगीतून इमारतीमध्ये एक देखणे सभागॄह बांधण्यात आले. शाळातर्गत अनेक कार्यक्रम याच सभागॄहात होत असतात.

 

शाळेच्या सुरूवातीपासुन 2006 सालापर्यंत प्राचार्या कै. श्रीमती. सुहासिनी कुलकर्णी यांनी शाळेचा पदभार संभाळला. यानंतर 2006 ते 2008 श्रीम.चित्रा कुलकर्णी यांनी प्राचार्या म्हणून धुरा सांभाळली. 2008 ते 2009 मध्ये श्री. रमेश मदने यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभाग सांभाळला. शैक्षणिक वर्ष 2009 ते 2013 या कालावधित श्री. सुभाष खिलारे हे प्राचार्य होते. शैक्षणिक वर्ष 2013 पासून प्राचार्या श्रीम.ज्योती निगुडकर ह्या पदभार सांभाळत आहेत.

सु.प्र.संघाचे माजी संस्थापक कार्याध्यक्ष कै. श्री.गो.रा.रानडे , माजी सदस्या कै. श्रीम. नीलातार्इ जोशी , संस्थेचे अध्यक्ष डॅा. वसंत खटाव , माजी कार्याध्यक्ष श्री.अंकोलेकर , श्री.भागवत , कै.नाना दामले , सु.प्र.संघाचे माजी पालक प्रतिनिधी व आताचे कार्यकारणीवर असलेले कार्यवाह श्री. मुकुंद वैद्य , श्रीम. प्रतिभा आपटे , कार्याध्यक्ष श्री.म.गो.रानडे , माजी प्राचार्या कै. श्रीम. सुहासिनी कुळकर्णी , श्रीम. चित्रा कुलकर्णी , श्री. सुभाष खिलारे तसेच आत्ताच्या प्राचार्या श्रीम.ज्योती निगुडकर तसेच मागाठाणे परिसरातील अनेक परिचितांनी , पालकांनी शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावला.

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.